मंचर बस स्थानकात प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारी सराईत टोळी जेरबंद, 6.92 लाखांचा मुद्देमाल जप्त.
मंचर बस स्थानकात प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारी सराईत टोळी जेरबंद, 6.92 लाखांचा मुद्देमाल जप्त.
आळेफाटा (प्रतिनिधी)
मंचर(ता. आंबेगाव)बस स्थानकावर प्रवासी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारी सराईत टोळी मंचर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. आरोपींकडून 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 6 लाख 92 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार.
9 मे रोजी सकाळी 9 वाजता शकुंतला मनोहर शिंदे, वय 69, रा. मंचर या नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातील बांगडी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचला. 13 जून रोजी रात्री 9 वाजता एकलहरे ता. आंबेगाव येथे बंद पडलेल्या मंगल कार्यालयाजवळ संशयितरित्या उभी असलेली MH-46-W-3184 क्रमांकाची एर्टिगा कार पोलिसांना आढळली. चौकशीत कारमधील चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अमोल सुरेश टिडंगे , वय 40,कपिल सुरेश टिडंगे, वय 38, दिपक अभंगे, वय 48, राजेश दिपक गारुंगे , वय 58
सर्व रा. सुभाषवाडी, वांद्रापाडा, अंबरनाथ, जि. ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कल्याण जि. ठाणे येथे 15 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्यांनी मंचर व खेड पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण तीन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींकडून 1 लाख 92 हजार 740 रुपये किमतीच्या 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व 5 लाख रुपये किंमतीची एर्टिगा कार असा एकूण 6,92,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक यादव, हवालदार शेखर भोईर, संजय नाडेकर, सुदाम घोडे, नंदकुमार आढारी, योगेश रोडे ,अजित पवार,हनुमंत ढोबळे, सुनील काठे,अविनाश दळवी,अतुल डेरे,संदीप फड,स्वप्नील गाढवे,निलेश सुपेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.पुढील तपास पोलीस हवलदार शेखर भोईर करीत आहेत.

No comments: