Header Ads

पिकअप-दुचाकी धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी.

  पिकअप-दुचाकी धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी.


------------------------
 कैलास बोडके.
------------------------

आळेफाटा(प्रतिनिधी )अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर करंजाळे गावच्या हद्दीत शनिवार दि. ७ जून रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. १४ के. ए.४३७७ क्रमांकाची पिकअप कल्याणकडून आळेफाट्याच्या दिशेने जात होती. तर एम. एच. १४ई. जे.७८६३क्रमांकाची दुचाकी ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. करंजाळे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघात दुचाकीस्वार रामदास दशरथ घोगरे, रा. खानगाव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव बांबळे, शामसुंदर जायभाये आणि ट्रॅफिक वार्डन शुभम काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

महामार्गावर सकाळच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ओतूर पोलिसांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.