डुंबरवाडी येथे भीषण अपघात: दुचाकीवरील दोघांचा मृत्यू.
डुंबरवाडी येथे भीषण अपघात: दुचाकीवरील दोघांचा मृत्यू.
ओतूर, दि. 14 जून:* जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी शिवारात नगर-कल्याण महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
ओतूर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 13/06/2026 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास डुंबरवाडी हद्दीतील किगा अँस्क्रीम समोर हा अपघात घडला. आळेफाटा बाजूकडून ओतूरकडे जाणारी यामाहा मोटारसायकल क्र. MH 12 XL 1380 व कल्याण बाजूकडून नगरकडे जाणारा अशोक लिलँड कंपनीचा कंटेनर क्र. MH 46 DC 2451 यांची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात मोटारसायकलवरील प्रणव नितीन डुंबरे (वय 25, रा. ओतूर, ता. जुन्नर) आणि गणेश विजय गाडेकर (रा. डिंगोरे, ता. जुन्नर) हे दोघे जागीच ठार झाले. कंटेनर चालक गणेश बाबासाहेब शिंदे (वय 37, रा. हिवेसिंगा, खोकारमोह, ता. जि. बीड) याला कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप आमने, पोलीस हवलदार नरेंद्र गोराने, शामसुंदर जायभाये, जोतिराम पवार, राजेंद्र आमले,ट्रॅफिक वार्डन शुमम काशीद, संदीप शिंदे,पोलीस पाटील किरण भोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
याप्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे अधिक तपास करत आहेत.

No comments: