तीन पानी जुगार खेळणारे सात जण रंगेहात जेरबंद.
तीन पानी जुगार खेळणारे सात जण रंगेहात जेरबंद.
--------------------------------------
कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
शांत कॉलनी परिसरातील एका बंद पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर तीन पानी जुगार अड्ड्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकून सात जणांना रंगेहात जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांत कॉलनी येथे सुजित विलास माने याच्या घराशेजारील बंद पत्राशेडमध्ये काही जण पैशांवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रवीण मोहिते व त्यांच्या पथकाने गुरुवारी (१८ जून) रात्री सुमारे आठ वाजता छापा टाकला.
या छाप्यात आरोपी टेबलभोवती खुर्च्यांवर बसून हातात तीन पत्ते घेऊन समोर भारतीय चलनी नोटा ठेवून बेकायदेशीरपणे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सुजित विलास माने (वय ३२, रा. शांत कॉलनी), तौफिक मुबारक मुल्ला (वय २६), आदर्श पोपट होवाळ (वय २५), दिग्विजय राजाराम पाटील (वय ३९, रा. बुधगाव), निलेश किरण पाटील (वय १९), इरफान मुसा मुल्ला (वय ३३) व केरबा बापू मेटकरी (वय २८) यांचा समावेश आहे.
घटनास्थळावरून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अंमलदार प्रवीण मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: