पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व दत्तक योजना
पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व दत्तक योजना...
बच्चे सावर्डे : लोकनेते विष्णूपंत बच्चे आण्णा यूथ फौंडेशनच्या वतीने विद्या मंदिर, बच्चे सावर्डे येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत लकी कुमार, आराध्या यादव, शिवगंगा लोंढे आणि जय पवार या चार विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले.
यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या, कंपास पेटी, वॉटरबॉटल, छत्री इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल सावंत यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाला हातभार लावण्यासाठी पंतआण्णा फौंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमास फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल सावंत, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ. अनिल सावंत, प्रभाकर पाटील, जगन्नाथ यादव, सयाजी पाटील, सुरेश गोरड, शितल जगदाळे, मयुरी जाधव, सुजाता बच्चे, रमेश कांबळे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र ओळ : पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने विद्या मंदिर, बच्चे सावर्डे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर.

No comments: