Header Ads

कोतोली येथील मित्रप्रेम बार वर छापा..

 कोतोली येथील मित्रप्रेम बार वर छापा...

1 लाख 9760 रुपये चा मुद्दे माल जप्त....


कोतोली (ता. पन्हाळा) येथील एका परमीट रूम आणि बिअर बारच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर व विनापरवाना साठवून ठेवलेला १ लाख ९ हजार ७६० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा पन्हाळा पोलिसांनी गुरुवारी सकाळी छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतोली गावातील 'मित्र प्रेम परमीट रूम आणि बिअर बार'च्या पाठीमागील बाजूस उघड्यावर बेकायदेशीर दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पंडित चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.

याप्रकरणी रवींद्र बाळू पाटील (वय ४०, रा. नणंद्रे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि अजित विठ्ठल खोत (वय २२, रा. परळी पैकी कासारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) या दोघांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नाईक करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.