कसबा वाळवे प्लास्टिक मुक्त प्लास्टिक कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
कसबा वाळवे प्लास्टिक मुक्त प्लास्टिक कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.
-----------------------------------पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कसबा वाळवे ता.राधानगरी यांनी “प्लास्टिकमुक्त गाव – पर्यावरणपूरक गाव” ही अभिनव मोहीम हाती घेतली आहे. गावातील नागरिकांनी घरातील प्लास्टिक कचरा वेगळा संकलित करून ग्रामपंचायतीकडे जमा करावा, असे आवाहन सरपंच वनिता पाटील यानी केले आले आहे.
या उपक्रमांतर्गत प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग, किराणा पिशव्या, दूध पिशव्या तसेच इतर प्लास्टिक वस्तू स्वच्छ करून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलित केलेला प्लास्टिक कचरा प्रति किलो १० रुपये दराने खरेदी केला जाणार असून, दर १० दिवसांनी रोख रक्कम देण्यात येणार आहे.
सध्या वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा ठेवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून "स्वच्छता, संरक्षण आणि समृद्धी" या उद्दिष्टातून राबविण्यात येणारी ही मोहीम गावाला पर्यावरणपूरक आणि आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायत प्रशाशनाने व्यक्त केला आहे.
“प्लास्टिकमुक्त गाव, हरित व समृद्ध गाव” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत कसबा वाळवेने उचललेले हे पाऊल परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.

No comments: