शिवसेना पक्ष संघटना बळकट करा तालुकाप्रमुख तानाजीराव चौगुले यांचे आवाहन.
शिवसेना पक्ष संघटना बळकट करा तालुकाप्रमुख तानाजीराव चौगुले यांचे आवाहन शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
------------------------------------राधानगरी येथे शिवसेना पक्षाच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्थापना दिन साजरा करण्यात आला यावेळी पक्ष प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजात रुजवणे,शिवसेना पक्षाची मजबूत बांधणी, कार्यकर्त्यांची संघटना सक्षम करणे, कार्यकर्त्यांनी शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचा निर्धार तानाजीराव चौगले यांनी केला. स्वागत दीपक शेट्टी यांनी केले
या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस तालुका प्रमुख तानाजीराव चौगले, संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष दीपक शेट्टी, सुधाकर साळोखे, युवा तालुका प्रमुख मयुर पोवार, सात्तापा बोडके,शहर प्रमुख मंगेश चौगले, संदिप चौगले,संतोष पाटील,अंकूश पाटील प्रकाश पार्टल, युवराज पाटील मंगेश टिपुगडे रविंद्र पाटील विश्वास टिपुगडे संग्राम पाटील, दिग्वीजय पाटील, एसके पाटील, हर्षवर्धन पाटील धनाजी चौगले संजय पाचवडेकर, उमेश जाधव राम टिपुगडे यांच्या सह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. आभार मंगेश चौगले यांनी मानले

No comments: