Header Ads

मुरगूडमध्ये स्मार्ट मीटरविरुद्ध महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा ! स्मार्ट मीटर जोडणी थांबवा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा !

 मुरगूडमध्ये स्मार्ट मीटरविरुद्ध महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा ! स्मार्ट मीटर जोडणी थांबवा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा !

-------------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
------------------------------

मुरगूड शहर व परिसरात सध्या वीज महावितरण कंपनीकडून छुप्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहिम सुरु आहे यास तीव्र विरोध करीत वीजग्राहकांकडून मुरगूड विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला . हुतात्मा तुकाराम चौकातून हा मोर्चा वीज कंपनीच्या  विभागीय कार्यालयावर आला यावेळी मोर्चातील सहभागींनी स्मार्ट मीटर बसवू नका ! अशा फलकांनी लक्ष वेधले व सक्तीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली .

 वीज कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक अभियंता श्रीमती मार्गशीर्षा चौगले व सुरेश कोकणे यांना चांगलेच धारेवर धरले आणि प्रश्नांचा भडीमार केला .वीजग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका सक्ती करू नका . जुने मीटरच पूर्ववत बसवावे . स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकावर लादण्याचा अगर दमदाटीचा प्रकार खपवून घेणार  नाही अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले .मोर्चामध्ये प्रामुख्याने कॉ बबन बारदेस्कर,  बि.एस.खामकर,समाधान हेंदळकर, शाहू फर्नांडीस,दगडू शेणवी, प्रदीप वर्णे ,मारुती पुरीबुवा, दिग्वीजय पाटील, विलास गुरव , प्रल्हाद कांबळे, सिकंदर जमादार  आदिसह शेकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते .

No comments:

Powered by Blogger.