Header Ads

दैनिक 'सुपर भारत'च्या संपादिका सोनाली बडवे यांना आरयारवी एंटरटेनमेंट, मुंबईचा 'अजय लेखणी पुरस्कार' जाहीर .

 दैनिक 'सुपर भारत'च्या संपादिका सोनाली बडवे यांना आरयारवी एंटरटेनमेंट, मुंबईचा 'अजय लेखणी पुरस्कार' जाहीर

------------------------------
शशिकांत कुभार.
-------------------------------

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरयारवी एंटरटेनमेंट, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'अजय लेखणी पुरस्कार' यंदा दैनिक 'सुपर भारत'च्या संपादिका सोनाली बडवे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात तसेच सुपर भारत परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी राज्यभरातील २२ संपादक, पत्रकार आणि कलावंतांची निवड करण्यात आली असून, पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दादर (मुंबई) येथील गावस्कर हॉलमध्ये उत्साहात पार पडणार आहे.

संपादिका सोनाली बडवे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, समाजाभिमुख आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या सन्मानाबद्दल फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्रच्या संपादिका रुपाली ताई कुंभार यांनी सोनाली बडवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांनी शुभेच्छा देताना, "आपल्या लेखणीने समाजहिताचे कार्य असेच सातत्याने घडत राहो आणि भविष्यातही आपल्या कार्याला असेच मानाचे पुरस्कार मिळोत," अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Powered by Blogger.