इंधन बचत हाच महागाईवर उतारा...अत्याधुनिक इ-सायकलमध्ये बदल...इंधन दरवाढीला इ-सायकल पर्याय..
इंधन बचत हाच महागाईवर उतारा...अत्याधुनिक इ-सायकलमध्ये बदल...इंधन दरवाढीला इ-सायकल पर्याय..
---------------------------
इराण-अमेरिका युध्दामुळे जगातील सर्वच वातावरण ढवळून निघाले आहे. अवघ्या दहा दिवसांत पेटोल व डिझेलच्या दरात लिटरमागे ८ रुपयांची दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका वाहतुकीवर, पर्यटनासह सर्व क्षेत्रांना बसला आहे. भविष्यात इंधन दरात आणखी दरवाढ होण्याचे संकेत आहेत. या वाढणाऱ्या इंधनावर आता पर्याय शोधणे गरजेचे आहे. भविष्यात शॉर्ट डिस्टन्ससाठी म्हणजेच फक्त शहरामध्ये फिरण्यासाटी आता इ-सायकलचा वापर वाढू लागला आहे.
१९७३ मध्ये जागतिक इंधन संकटावेळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर इ-सायकल्सची विक्री झाली होती. २०२२ मध्ये १६ दिवसांत १४ वेळा इंधनाची दरवाढ झाली होती. इंधन दरवाढीमुळे यावर आधारित जीवनावश्यक वस्तूही महागल्या आहेत. ढीवर आता, शहरातील ५ ते ३० किलोमीटर परिसरात
फिरणारे आता, वाहनापेक्षा इ-सायकल्सना पसंती देऊ लागले आहेत.लांबचा प्रवास, पावसाळा यासाठी याचा वापर होत नाही. याला काही मर्यादाही आहेत. पण विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक व नोकरादार वर्गासाठी इ-सायकल उपयुक्त ठरत आहे.
*इंधन खर्च...*
एका व्यक्तीस एका दिवसासाठी इंधनाचा होणारा खर्च. दुचाकीला रोजचा खर्च ७० ते १२० रुपये इ-स्कूटरसाठी १० ते २०रुपये तर ई-सायकलसाठी ३ ते ८ रुपये खर्च करावा लागत आहे. याचा विचार करूनच लोक या दरवाढीवर पर्याय शोधत आहेत.लिथियम अगयन बॅटरी, स्मार्ट कंट्रोल, पेडल असिस्ट, जीपीएस, फास्ट चार्जिंग सुविधा इ-सायकलमध्ये उपलब्ध आहेत.
चौकट-1
३० हजार रुपयांपासून इ-सायकल, नामवंत कंपन्यांकडून उत्पादन आज इ-सायकलच्या उत्पादनामध्ये नामवंत १० ते १५ कंपन्या उतरल्या आहेत. यामध्ये मर्चिडीस बेंज, टाटा एसरपासून स्थानिक सायकल कंपन्यांचाही समावेश आहे. ब्रेडेड कंपन्यांच्या सायकलची किंमत तीस हजारांसून ७० हजार रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे, आता जुन्या काळया सायकलींचेसुध्दा इ-सायकलमध्ये कन्व्हर्ट करणारी यंत्रणाही आहे. यामध्ये स्टार्टअप कंपन्याही उतरल्या असून याच्या बॅटरीची गॅरंटी तीन ते पाच वर्षाची दिली जात आहे. ब्रेड, मोठे डिलर, प्रीमीयम व स्पोर्टी, मजबूत, युवकामध्ये लोकप्रिय डिझाईन, फिटनेस, बजेट कमी, बॅटरी उत्पादन, चार्जिंग नेटवर्क ही वाढत चालले आहे. चांगल्या बॅटरीची किंमत जास्त, चार्जिंगला लागणारा वेळ, स्वस्त मॉडेल कमी गुंणवता, चोरीची धोका असल्याने या महागाईच्या काळात आता बचतीशिवाय पर्याय नाही.
चौकट-2
*इ-सायकलसाठी १८९५ मध्ये पहिले पेटंट*
१८९५ मध्ये अमेरिकेमध्ये ओग्डेन बोल्टन यांनी इ-सायकलसाठी पहिले पेंटंट घेतले आहे. १९२० मध्ये हाईन्झमन या जर्मन कंपनीने इ-सायकल्सचे उत्पादन सुरू केले. १९८२ ला संशोधक इगॉन गेलहार्ड यांनी इ-सायकलला पर्याय म्हणून पेडल सुरू केले. १९९७ मध्ये जपानने अत्याधुनिक यामाहाच्या इ-सायकल्सची २ लाख विक्री झाली आहे. होंडाची पहिली फोल्डींग इ-सायकल बाजारात आली. २००९ ला चीनमध्ये २१ दशलक्ष सायकली विकल्या गेल्या होत्या.


No comments: