Header Ads

राष्ट्रीय जिवलग मित्र दिनानिमित्त जुन्या मैत्रीला उजाळा “सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारा तोच खरा जिवलग मित्र” – मेजर वैभव कुलकर्णी, धनाजी खेबुडकर

 राष्ट्रीय जिवलग मित्र दिनानिमित्त जुन्या मैत्रीला उजाळा“सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारा तोच खरा जिवलग मित्र” – मेजर वैभव कुलकर्णी, धनाजी खेबुडकर.

----------------------
सस्कार कुभार.
-----------------------
कोल्हापूर.

राष्ट्रीय जिवलग मित्र दिनानिमित्त एसएससी १९८१ बॅचच्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे अनमोल महत्त्व अधोरेखित केले. यावेळी बोलताना मेजर वैभव कुलकर्णी आणि धनाजी खेबुडकर यांनी, “सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे साथ देणारा तोच खरा जिवलग मित्र असतो,” असे भावनिक उद्गार काढले.

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, काळ बदलला, परिस्थिती बदलली, अनेक मित्र-मैत्रिणी नोकरी, व्यवसाय किंवा विवाहानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले; मात्र मैत्रीचे बंध आजही तितकेच घट्ट आहेत. जीवनातील अडचणी, आनंदाचे क्षण आणि संकटाच्या प्रसंगी मित्र एकमेकांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करत असतात.

त्यांनी पुढे सांगितले की, बॅचमधील काही मित्र आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, त्यांच्या आठवणी जपणे आणि मैत्रीचे नाते पुढील पिढीपर्यंत टिकवून ठेवणे हीच खरी मैत्रीची ओळख आहे. मैत्री हे केवळ नाते नसून आयुष्यभर जपण्यासारखी एक मौल्यवान भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय जिवलग मित्र दिनानिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात मेजर वैभव कुलकर्णी, धनाजी खेबुडकर, राजेंद्र टिपू गडे आणि विजय बकरे उपस्थित होते. जुन्या आठवणी, मनमोकळ्या गप्पा आणि मैत्रीच्या भावनेने हा दिवस संस्मरणीय ठरला.

No comments:

Powered by Blogger.