Header Ads

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पुसद ते गहुली भव्य कृषीदिंडी....!

 हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पुसद ते गहुली भव्य कृषीदिंडी....!युवक व शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन..!

------------------------------------------
सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
------------------------------------------

पुसद - हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती पुसद च्या वतीने पुसद ते गहुली अशी दुचाकी वाहनांची भव्य कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती च्या माध्यमातून पुसद  ते गहुली अशी कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कृषी दिंडीमध्ये अधिकाधिक युवकांचा सहभाग व्हावा या साठी   माजी मंत्री मनोहरराव नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाईक बंगला येथे बैठक संपन्न झाली .

वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या या कृषी दिंडीमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी युवकांनी सहभागी होऊन हा भूमिपुत्र अभिवादन सोहळा यशस्वी करावा असे आवाहन माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी उपस्थित सहकाऱ्यांना केला. ना. इंद्रनील नाईक आणि पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी या सभेला संबोधित करताना 

सर्वच ज्येष्ठ व युवा सहकाऱ्यांनी कृषी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी सांगितले.ही कृषी दिंडी वसंतराव नाईक चौक पुसद ते समाधीस्थळ गहुली येथे जाऊन भूमिपुत्र अभिवादन सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती  माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी दिली.

कृषी दिंडी निमित्त आयोजित या बैठकीला पुसद महागाव व उमरखेड तालुक्यातील सहकारी तथा पदाधिकारी युवा मंडळी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.