अनुस्कुरा घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू
अनुस्कुरा घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहुवाडी : अनुस्कुरा घाटात आज अचानक दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दरड रस्त्यावर आल्यामुळे प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत वाहतूक नियंत्रणात आणली असून सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावर पडलेला माती व दगडांचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्याशिवाय घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे

No comments: