Header Ads

डॉ. सतीश चिद्दवार यांना 'विदर्भ रत्न' पुरस्काराने सन्मानित!

 डॉ. सतीश चिद्दवार यांना 'विदर्भ रत्न' पुरस्काराने सन्मानित!अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पुसद/ : विदर्भाच्या विकासामध्ये व्यावसायिक  शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आणि जमीन विकासाक बांधकाम क्षेत्रात महाराष्ट्राची राजधानी नागपूर येथे 'सुखकर्ता नागरी' प्रकल्प पंतप्रधान निवास योजनेतंर्गत नागपूर येथे मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांचं स्वप्नपूर्ती करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून विदर्भाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्यारे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सतीश चिद्दरवार यांच्या कार्याची 'रिसिल ग्रुपच्या' वतीने दखल घेऊन १जुलै २०२६ रोजी सोलिटेर हॉटेल अँड बॅक्वेट्स नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मराठी आणि हिंदी क्षेत्रातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते आणि विविध मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सतीश चिद्दरवार यांना 'विदर्भ रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.तर ही पुसद शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

याबाबत माहिती अशी की, नुकताच 'रीसिल ग्रुप' यांनी 

 १९ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील सोलिटेर हॉटेल अँड बँक्वेट्स येथे 'विदर्भ रत्न' पुरस्कार २०२६'सोहळा पार पडला या कार्यक्रमात  विदर्भाच्या विकासामध्ये ज्यांचे हातभार लागले ते विदर्भातील नामवंत उद्योजक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.त्यामधे

पुसदचे सुपुत्रांनी विदर्भाच्या विकासामध्ये व्यावसायिक वैद्यकीय क्षेत्रात आणि जमीन विकासाक तसेच बांधकाम क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून विदर्भाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले ते पुसद शहरातील वैद्यकीय क्षेत्रासह ले-आऊट तसेच'सुखकर्ता नागरी' प्रकल्प पंतप्रधान निवास योजनेतंर्गत नागपूर येथे ९०० च्या वर मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांचं स्वप्नपूर्ती करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रथम शंभर घराच्या हस्तांतरण करण्यात आलेल्या प्रकल्पासाठी तसेच

 हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्यामुळे १९जुलै २०२६ रोजी सोलिटेर हॉटेल अँड बॅक्वेट्स नागपूर येथे 'रिसिल ग्रुप'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात मराठी आणि हिंदी क्षेत्रातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सतीश चिद्दरवार यांना 'विदर्भ रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नागपूर येथील सोलिटेर हॉटेल अँड बॅक्वेट्स येथे 'रिसेल ग्रुप'द्वारे आयोजित कार्यक्रम मोठ्या दिमाखात हे सोहळा पार पडला डॉ. सतीश चीद्दरवार यांनी पुसद शहराचे यवतमाळ जिल्ह्यात आणि विदर्भात  स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याने आज पर्यंत त्यांना  आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने त्यांच्या एकसष्ठी निमित्त ‘सुश्रुत जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. तसेचपुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयोजित ‘आयएमए' हॅलो मध्ये तसेच नुकताच१ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स 'डे' दिवसानिमित्त पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयोजित ‘आयएमए' हॅलो मध्ये 

त्यांना 'जिवन गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते.

डॉ.सतिश चिद्दरवार यांना 'लोकमत टाइम्स' च्या 'आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया' या 'कॉफी टेबल बुक' चा नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच पोहरादेवी येथील भक्तीधाम येथे आयोजीत गोर बंजारा एकता संमेलन २०२५ या ऐतिहासीक कार्यक्रमाच्या सोहळ्यात मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसद चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सतीश चिद्दरवार यांचा विधान परिषद सदस्य आमदार धर्मगुरू संत बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच दि,१९ जुलै रोजी रात्री रोटरी क्लबच्या वतीने पुरस्कार मिळाल्याने सत्कार करण्यात आला असून आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात तसेच ले-आउट बांधकाम व शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असुन शहरात  मागील ४५ वर्षापासून निरंकार सेवा देत असल्यामुळें विदर्भात जन्मलेल्या सुप्रसिद्ध डॉ.सतीश चिद्दरवार यांचा हा यशस्वी प्रवास पाहता. त्याच्या कार्याची दखल घेत त्याना ‘विदर्भ रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. त्यामुळे डॉक्टर सतीश चिद्दरवार यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.