गुरुवर्य श्री. सुभाष दत्तोबा शिंपूगडे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मानाचा मुजरा!"गुरु असावा तर सुभाष शिंपूगडे सरांसारखा..."
गुरुवर्य श्री. सुभाष दत्तोबा शिंपूगडे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मानाचा मुजरा!"गुरु असावा तर सुभाष शिंपूगडे सरांसारखा..."
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त गुरुवर्य श्री. सुभाष दत्तोबा शिंपूगडे यांना कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा!
कोल्हापूर :- शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर असंख्य विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण देत त्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
शिक्षक पदावरून निवृत्त झाल्यानंतरही समाजसेवेचा वसा त्यांनी सोडला नाही. वकिली व्यवसाय स्वीकारून अनेक गरीब, गरजू आणि वंचित मुला-मुलींच्या न्यायासाठी त्यांनी निःस्वार्थपणे लढा दिला. अनेक प्रकरणांमध्ये कोणतेही मानधन न घेता त्यांनी मोफत कायदेशीर मदत करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
ज्ञान, संस्कार, न्याय आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम असलेले गुरुवर्य श्री. सुभाष दत्तोबा शिंपूगडे हे खऱ्या अर्थाने आदर्श गुरु आहेत.
संस्कारमय मार्गदर्शनाचे फलित!
त्यांच्या आदर्श शिक्षण व मार्गदर्शनामुळेच आज मी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब चॅनलमध्ये माझी पत्नी संपादिका म्हणून कार्यरत आहे, तर मी स्वतः दैनिक सुपर भारत कोल्हापूर आवृत्तीचा संपादक म्हणून कार्यरत आहे. हे सर्व त्यांच्या संस्कारमय मार्गदर्शनाचे फलित आहे.
आपला शिष्य,
श्री शशिकांत शामराव कुंभार

No comments: