Header Ads

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याचशक्यता; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी :- 

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास बुधवारी सुरुवात झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याची माहिती जलसंपदा विभाग, राधानगरी यांनी दिली आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी 346.62 फूट इतकी असून, पाणीसाठा 8192.93 दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणाच्या बीओटीमधून 1,400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुधवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत धरण परिसरात 48 मिमी पाऊस झाला असून, 1 जून ते 29 जुलै 2026 अखेर एकूण 2720 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणावरील सात स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी कार्यान्वित होऊ शकतात. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

एका नजरेत...

💧 धरण भरले : 100%

📏 पाणीपातळी : 346.62 फूट

🌊 पाणीसाठा : 8192.93 दशलक्ष घनफूट

🚰 बीओटी विसर्ग : 1,400 क्यूसेक

🌧️ सकाळी 8 ते सायंकाळी 4 पाऊस : 48 मिमी

☔ 1 जून ते 29 जुलै 2026 एकूण पाऊस : 2720 मिमी

⚠️ सात स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता

No comments:

Powered by Blogger.