कोल्हापूरच्या तावडे हॉटेल येथील कमान पुनर्उभारणीसाठी राजे फाउंडेशन आक्रमक; २७ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा...
कोल्हापूरच्या तावडे हॉटेल येथील कमान पुनर्उभारणीसाठी राजे फाउंडेशन आक्रमक; २७ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा..
: शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या तावडे हॉटेल येथील पाडलेली स्वागत कमान कोल्हापूर महानगरपालिकेकडून कधी बांधली जाणार, याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने 'राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य' संघटना आता आक्रमक झाली आहे. फाउंडेशनने महापालिका प्रशासनाला १५ दिवसांच्या आत या कमान उभारणीचा संपूर्ण तपशील देण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
१५ दिवसांत माहिती न मिळाल्यास महापालिकेवर धडकणार आंदोलन
राजे फाउंडेशनने कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापालिकेच्या वतीने तावडे हॉटेल या ठिकाणी भव्य कमान उभारण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव ती कमान पाडण्यात आली. त्यानंतर या कमानीच्या पुनर्उभारणीबाबत महापालिकेने अद्याप आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही
या पार्श्वभूमीवर, राजे फाउंडेशनने महापालिकेकडे खालील प्रश्नांचा तपशील मागितला आहे:
१. तावडे हॉटेल येथील कमान महापालिकेकडून कधी बांधण्यात येणार आहे?
२. या कमानीच्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे?
३. ही कमान बांधून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी निश्चित केला आहे?
प्रशासनाला इशारा
हा सर्व तपशील पुढील १५ दिवसांच्या आत राजे फाउंडेशनला प्राप्त न झाल्यास, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वीजबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, अशी स्पष्ट दखल प्रशासनाने घ्यावी, असेही या निवेदनात बजावण्यात आले आहे.निवेदन देण्यासाठी
मा.रियाज जैनापुरे
संस्थापक अध्यक्ष
रशीद सय्यद
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
नरेंद्र पोवार
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
नरेंद्र गागडे
कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख
रियाज गोलंदाज
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष
इमरान मुजावर
कोल्हापूर जिल्हा सचिव
अमोल शेटके
करवीर तालुका उपाध्यक्ष
शिवाजी चव्हाण
कोल्हापूर जिल्हा सदस्य

No comments: