सांगलीत पंक्चर व्यावसायिकाची हत्या; गोकुळनगर परिसरात खळबळ.
सांगलीत पंक्चर व्यावसायिकाची हत्या; गोकुळनगर परिसरात खळबळ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली मिरज प्रतिनिधी.राजु कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात पंक्चर व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृत व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी परिसर सील करून श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित केले. प्राथमिक तपासात हत्येमागे जागेच्या वादाचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.
या प्रकरणाचा अधिक तपास संजयनगर पोलीस करत असून, संशयितांचा शोध सुरू आहे. हत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments: