. लक्ष्मण गायकवाड यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त सावली केअर सेंटरमध्ये अन्नदान व श्रद्धांजली कार्यक्रम
कै. लक्ष्मण गायकवाड यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त सावली केअर सेंटरमध्ये अन्नदान व श्रद्धांजली कार्यक्रम.
कोल्हापूर :- कै. लक्ष्मण गायकवाड यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त सावली केअर सेंटर येथे सामाजिक बांधिलकी जपत वयोवृद्ध रुग्ण, आश्रमातील गरजूंना प्रेमपूर्वक अन्नदान करण्यात आले. तसेच रुग्णांची सेवाभावाने काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला.
कै. लक्ष्मण गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मराठी व हिंदी भावगीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कै. गायकवाड यांच्या पत्नी कमला गायकवाड, मोठी मुलगी व कारागृह प्रशासन अधिकारी सौ. नविता नाईक, आयोजक कृषि अधिकारी सौ. माया लोंढे, संध्या कुलकर्णी, सौ. शिवानी देसाई, निकिता माने, प्राजक्ता मॅडम, मास्टर संजय, श्री. सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय माहिती अधिकारचे कोल्हापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख श्री. प्रशांत गोंधळी यांनी केले. कार्यक्रमास सावली केअर सेंटरचे व्यवस्थापन संचालक, सर्व कर्मचारी व सेवाभावी नागरिक उपस्थित होते. अन्नदान, सेवाकार्य आणि संगीताच्या माध्यमातून कै. लक्ष्मण गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments: