दूधगंगा धरणातून उद्या सकाळी ८ वाजता पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
दूधगंगा धरणातून उद्या सकाळी ८ वाजता पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; सुरुवातीला ९०० क्युसेक विसर्ग, गरजेनुसार आणखी वाढणार.
कोल्हापूर :- दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून विद्युत निर्मिती केंद्रातून ९०० घनफूट प्रति सेकंद (क्युसेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती दूधगंगा धरण व्यवस्थापनाने दिली आहे.धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आगामी काळात धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार हा विसर्ग आवश्यकतेनुसार वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. तसेच नदीकाठी ठेवलेले शेतीसाहित्य, जनावरे आणि इतर मौल्यवान वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, असेही धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

No comments: