Header Ads

मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा धिंगाणा; 120.9 डेसिबल आवाज, सहाजणांवर गुन्हा पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष; मिरवणूक रस्त्यातच थांबवून बेधुंद नाचल्याचा आरोप.

 मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा धिंगाणा; 120.9 डेसिबल आवाज, सहाजणांवर गुन्हा पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष; मिरवणूक रस्त्यातच थांबवून बेधुंद नाचल्याचा आरोप.

मिरज | प्रतिनिधी : राजू कदम.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 362/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 223 व 292 तसेच ध्वनीप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई दत्तात्रय गुंडू राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 9.45 वाजता नागोबा कट्टा, मिरज येथे मुरलीधर गणेश उत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये आवाजाची पातळी 120.9 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली.

फिर्यादीनुसार, पोलिसांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र आरोपींनी त्या धुडकावून लावत डॉल्बी सुरूच ठेवला. तसेच सार्वजनिक रस्त्यावर मिरवणूक थांबवून बेधुंद नाचत वाहतुकीस अडथळा निर्माण केला आणि मिरवणूक पुढे नेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सुनील इंगोले, निशांत म्हेत्रे, विशाल गवळी, ओंकार रजपुत, शिवराज पाटील तसेच डॉल्बी मालक प्रशांत बराडे (बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत. गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा मिरज शहर पोलिसांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.