Header Ads

काटे भोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बबन हिंदुराव खाटांगळेकर यांना 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित.

 काटे भोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बबन हिंदुराव खाटांगळेकर यांना 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित.

--------------------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

९५९५३१६२६६

--------------------------------

 काटे भोगाव, ता. पन्हाळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष *बबन हिंदुराव खाटांगळेकर* यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पन्हाळा प्रेस क्लबच्या वतीने त्यांना "समाजरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आले.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य संलग्न व सेवा फाउंडेशन प्रायोजित पन्हाळा प्रेस क्लबच्या वतीने आयोजित सन २०२६ च्या गौरव कर्तृत्ववान व्यक्तींचा... सोहळा आनंदाचा या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.


*अंधारातून प्रकाशाकडे नेणारे कार्य -*


श्री. खाटांगळेकर यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात अतिशय मोलाच्या कामातून केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी बी.पी.एल. धारकांना लाईट मीटर उपलब्ध करून दिले. तसेच पडसाळी व इतर धनगरवाड्यावर पोल टाकून लाईट देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. कित्येक पिढ्या दिवाबत्तीवर काढलेल्या कुटुंबांच्या झोपडीत लाईटचा आनंद त्यांनी आणला.


*शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा -*


रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे.


- ऊसाला एफ.आर.पी. नको, आम्हाला एम.आर.पी. द्या या मागणीसाठी आंदोलन

- ऊस दरवाढीसाठी आंदोलन

- शेतकऱ्यांना बारा तास दिवसा लाईट मिळावी यासाठी आंदोलन

- पुरामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन

- पुरात बाधित झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या तात्काळ दुरुस्तीसाठी आंदोलन

- अखंडित वीज पुरवठ्यासाठी आंदोलन

- वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी सर्व शेतकऱ्यांना बंदुका द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन


अशा अनेक विषयांवर त्यांनी महावितरण, साखर आयुक्त, वन विभाग यांना निवेदने देऊन आंदोलने केली आहेत.


याशिवाय गावामध्ये आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रमही त्यांनी सातत्याने राबवले आहेत.


त्यांच्या या अविरत सामाजिक कार्याची दखल घेऊन पन्हाळा प्रेस क्लबने त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.


या पुरस्कार सोहळ्यास कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतापसिंह जाधव, उद्योजक नामदेव पवार, महेश पोतदार, माजी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र सुतार, पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण मस्कर, उपाध्यक्ष सुनिल मोळे, सचिव दशरथ खुटाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


बबन खाटांगळेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल काटे भोगाव, पन्हाळा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:

Powered by Blogger.