४ बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद... पण काही तासांतच मृत्यू!; १८ दिवसांच्या थरारक ऑपरेशनचा नाट्यमय शेवट.
४ बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद... पण काही तासांतच मृत्यू!; १८ दिवसांच्या थरारक ऑपरेशनचा नाट्यमय शेवट.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
पी. एन. देशमुख
--------------------------------------
मंगळवारी (८ सप्टेंबर) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात कार्डिओ-रेस्पिरेटरी फेल्युअर (हृदय व श्वसनक्रिया बंद पडणे) हे मृत्यूचे प्रथमदर्शनी कारण असल्याचे समोर आले आहे. अंतिम कारण निश्चित करण्यासाठी अवयवांचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
१८ दिवस परिसरात दहशत
१७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत या वाघिणीने अमरावती व वर्धा जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी आणि शिरजगाव कसबा परिसरात अवघ्या २४ तासांत दोन नागरिकांवर हल्ले करत तिने चार जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण होते.
आमदारांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई
राजाभाऊ भोयर यांच्या मृत्यूनंतर आमदार सुमित वानखेडे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर नरभक्षक वाघिणीला पकडण्याचे आदेश देण्यात आले. तीन ते चार वर्षांची ही वाघीण अत्यंत चपळ असल्याने तिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला तब्बल १८ दिवस मोठी मोहीम राबवावी लागली.
चार बळी, १८ दिवसांची दहशत आणि अखेर जेरबंदीनंतर मृत्यू — या संपूर्ण घटनेने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

No comments: