धक्कादायक! जीएमसी मिरज प्रवेशद्वाराची कमान कोसळली; ३ ते ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.
धक्कादायक! जीएमसी मिरज प्रवेशद्वाराची कमान कोसळली; ३ ते ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.
----------------------------
मिरज प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येत असलेली नवीन कमान अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, बांधकामावर काम करणारे ३ ते ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर रुग्णालय प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. परिसरात मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.
अडकलेल्या कामगारांची अधिकृत संख्या आणि जखमींबाबतची माहिती अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. दुर्घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.

No comments: