यवतमाळमध्ये LCB ची धडक कारवाई! तरोडा फाट्यावर तरुणाकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.
यवतमाळमध्ये LCB ची धडक कारवाई! तरोडा फाट्यावर तरुणाकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.
----------------------------------------यवतमाळ | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
सिद्धार्थ कदम.
--------------------------------------------
यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा फाटा येथे एका तरुणाला गावठी बनावटीच्या देशी पिस्टलसह अटक केली. आरोपीकडून ३० हजार रुपयांचे गावठी पिस्टल आणि १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून तरोडा फाटा परिसरात एका तरुणाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख अरबाज शेख रोशन (वय 23, रा. वरुड, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अंतर्गत पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB आणि पोफाळी पोलीसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

No comments: