३५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! दिवसा वीज द्या, राष्ट्रवादी शरद पवार गटाची महावितरणकडे मागणी.
३५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! दिवसा वीज द्या, राष्ट्रवादी शरद पवार गटाची महावितरणकडे मागणी.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | अमरावती प्रतिनिधी : पी. एन. देशमुख
अमरावती जिल्ह्यातील जामोद, वडशिंगी, खेडा सर्कल व बोर्ड परिसरात तब्बल ३५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर आली आहेत. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी विहीर आणि बोअरवेलच्या पाण्यावर सिंचन करत आहेत. मात्र महावितरणकडून शेतपंपासाठी रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर आता महिनाभरापासून पाऊस गायब झाला आहे. परिणामी वाढलेल्या अवस्थेतील सोयाबीन व कापूस पाण्याअभावी कोमेजू लागले आहेत. शेतकरी विहीर व बोअरवेलमधील उपलब्ध पाण्यावर पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रात्री अंधारात शेतात जाऊन सिंचन करताना साप, विंचू आणि हिंसक प्राण्यांचा धोका वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
महावितरणने शेतकऱ्यांच्या अडचणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जामोद, वडशिंगी व खेडा सर्कलमधील सर्व गावांना तातडीने दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत पाटील, वर्षा वाघ, तालुकाप्रमुख प्रमुख सपकाळ, विश्वासराव भालेराव, इरफान खान, सिद्धार्थ आठवते, दिगंबर फुले, शास्त्रज्ञ कोकाटे, अतुल मानकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
पावसाने दांडी; उत्पादन धोक्यात
सलग ३५ दिवस पाऊस न पडल्याने खरीप पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या "पीक वाचवणे हेच शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान" बनले असून, वेळेत दिवसा वीजपुरवठा मिळाल्यास मोठ्या प्रमाणात पिके वाचू शकतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

No comments: