कळे येथे शहीद जवान मच्छिंद्र देसाई स्मृतीस्थळी वृक्षारोपण; झाडांच्या संवर्धनाचा संकल्प.
कळे येथे शहीद जवान मच्छिंद्र देसाई स्मृतीस्थळी वृक्षारोपण; झाडांच्या संवर्धनाचा संकल्प.
----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
----------------------------------
कळे :- येथील शहीद जवान मच्छिंद्र देसाई यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी, कळे-पुनाळ रोडवर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मरळी व देव, देश, धर्म रक्षक संघटना, कळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण तसेच यापूर्वी लावलेल्या झाडांना आधार देणे व त्यांची देखभाल करणे, असा कार्यक्रम घेण्यात आला.
शहीद जवानांच्या स्मृती जपणे हाच खरा सन्मान आहे, या भावनेतून या ठिकाणी सातत्याने वृक्षारोपण केले जात आहे. लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांना बांबूचा आधार देण्यात आला असून पाणी घालून निगा राखण्यात आली.
यावेळी कळे विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघटना व श्री समर्थ बहुउद्देशिय संस्था मरळीचे पुरस्कार प्राप्त सुरेश नाईक , स्वच्छता दूत पुरस्कार प्राप्त शरद दंताळ, संभाजी दांगट तसेच देव, देश, धर्म रक्षक संघटनेचे अक्षय बेलेकर व सतीश आडेकर-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शहीद जवान मच्छिंद्र देसाई यांच्या बलिदानाची आठवण म्हणून या ठिकाणी तयार होत असलेली हिरवळ हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments: