गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांचे 'आदान-प्रदान'; शाहूपुरी पोलीस ठाण्यात कडकसूचना.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांचे 'आदान-प्रदान'; शाहूपुरी पोलीस ठाण्यात कडकसूचना.
-------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
-------------------------------------
कोल्हापूर:आगामी गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्री. *नीलोत्पल* यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे 'गुन्हेगार आदान-प्रदान' (Criminal Exchange) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहूपुरी पोलीस ठाणे येथे झालेल्या या कारवाईत शहरातील एकूण ९० सराईत गुन्हेगारांना हजर करण्यात आले होते.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक इशारागणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील हिस्ट्रीशिटर, सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारी व तडीपारीसारख्या प्रभावी प्रतिबंधक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने आज जमा केलेल्या ९० गुन्हेगारांना उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करण्याबाबत आणि कायदा-सुव्यवस्था हातात न घेण्याबाबत सक्त सूचना व इशारा देण्यात आला. या कार्यक्रमात गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्या इतर आवश्यक माहितीची देवाण-घेवाण (आदान-प्रदान) करण्यात आली.विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई:या मोहिमेत कोल्हापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना एकत्र आणण्यात आले होते:*शाहूपुरी पोलीस ठाणे: २८ सराईत* *आरोपीलक्ष्मीपुरी पोलीस ठाणे:*२८ सराईत आरोपीराजवाडा पोलीस ठाणे: १९ सराईत आरोपीराजारामपुरी पोलीस ठाणे: १५ सराईत आरोपीएकूण*: ९० गुन्हेगारवरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीया महत्त्वपूर्ण कारवाईच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी *श्रीमती प्रिया पाटील, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. श्रीकांत ठिकाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोळके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम कव्हेकर, राजवाड्याचे पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव आणि राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. किरण लोंढे* यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकाचे (DB) अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: