Header Ads

स्मुर्तीशेष, समाधान केवटे यांच्या पुण्यानुमोदन दिनी बोधी वृक्षाचे रोपण!

 स्मुर्तीशेष, समाधान केवटे यांच्या पुण्यानुमोदन दिनी बोधी वृक्षाचे रोपण!

----------------------------------------

पुसद तालुका प्रतिनिधी

सिद्धार्थ कदम

----------------------------------------

वृक्षारोपण दिन पुढील काळात स्मरण दिन म्हणून आठवणीला उजाळा मिळेल.

निंबी- पार्डी

 स्मृतीशेष, पत्रकार समाधान केवटे यांचा आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यानुमोदन अभिवादन दिना निमित्त बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण करण्यात आले.



सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी निंबी पार्डी परिसराचे लोकमत वृत्तपत्राचे वार्ताहर पत्रकार तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे ग्रामीण यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी समाधान केवटे यांचे हरदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. 


 त्यानिमित्य आज बौद्ध संस्कार परंपरे नुसार त्यांचा पुण्यानुमोदन अभिवादन श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व विधी परंपरा पार पडल्या नंतर नूतन स्मशानभूमी येथे त्यांनीच निर्माण केलेल्या व त्या स्मशानभूमीचे तेच शिल्पकार असलेल्या स्मृतीशेष समाधान केवटे यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून या दिनानिमित्त आठवण व स्मरण राहावे म्हणून बौद्ध धम्मा मध्ये पिंपळ वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याने बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.


 *मरावे परी, कीर्ती रुपये उरावे* या सुविचारा प्रमाणे या वृक्षाकडे बघून निश्चितच त्यांचे स्मरण होणार आहे.


यावेळी उपस्थित नितीन केवटे (शिक्षक नाशिक), चिरंजीव अनिकेत समाधान केवटे व परिवार सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.