गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर *करवीर उपविभागात १७२ गुन्हेगारांची ओळखपरेड.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर *करवीर उपविभागात १७२ गुन्हेगारांची ओळखपरेड.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
--------------------------------
कोल्हापूर पोलीस प्रशासनाचा कडक इशारा; शांतता भंग केल्यास होणार कठोर कारवाईकोल्हापूर: आगामी गणेशोत्सव २०२६ शांततामय, उत्साहपूर्ण वातावरणात आणि कायदा-सुव्यवस्था राखून पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, करवीर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १७२ रेकॉर्डवरील आरोपींची ओळखपरेड करवीर पोलीस ठाणे येथे संपन्न झाली.मागील ५ वर्षांमध्ये (सन २०२० ते २०२५) गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी संकलित केली होती. या अनुषंगाने करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या उपस्थितीत सर्व आरोपींची ओळख पडताळणी करण्यात आली.पोलीस ठाणेनिहाय हजर राहिलेले आरोपी:करवीर पोलीस ठाणे: ६० आरोपीशिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे: ५१ आरोपीमुरगुड पोलीस ठाणे: १८ आरोपीकागल पोलीस ठाणे: १३ आरोपीगांधीनगर पोलीस ठाणे: १२ आरोपीइस्पुर्ली पोलीस ठाणे: ०६ आरोपीसोशल मीडियावरील अफवांवर विशेष नजरओळखपरेड दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी सर्व संबंधित आरोपींना कडक सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे अनुचित कृत्य खपवून घेतले जाणार नाही. विशेषतः सोशल मीडियावरून आक्षेपार्ह, वादग्रस्त किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट, मेसेज आणि वक्तव्यांचा प्रसार करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.नागरिकांना सहकार्याचे आवाहनगणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर परिस्थितीनुसार प्रतिबंधात्मक आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस दलाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कारवाईच्या वेळी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर (करवीर), श्री. किशोर शिंदे (गांधीनगर), श्री. अजित जाधव (कागल), तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड (शिरोली MIDC), रणजित पाटील (गोकुळ शिरगाव), अभिजित पाटील (इस्पुर्ली), क्रांती पाटील (मुरगुड) आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणारे सर्व गोपनीय अंमलदार उपस्थित होते.

No comments: