कोल्हापुरात उद्या गोकुळाष्टमी निमित्त वाहतूक मार्गांत मोठे बदल.
कोल्हापुरात उद्या गोकुळाष्टमी निमित्त वाहतूक मार्गांत मोठे बदल.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
-------------------------------
जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्गकोल्हापूर: शहरात ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळाष्टमी निमित्त भव्य दहिहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शहरातील मुख्य चौकांमध्ये होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत. उद्या दुपारी १४:०० वाजल्यापासून दहिहंडी कार्यक्रम संपरेपर्यंत हे बदल लागू राहतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे सविस्तर नियोजन खालीलप्रमाणे आहे:⛔ वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग (नो-एंट्री)१. व्हिनस कॉर्नर ते सीपीआर हॉस्पिटल चौक: या मार्गावर व्हीनस कॉर्नर, टायटन शोरूम आणि सीपीआर चौक येथून सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.२. जुने ट्रॅफिक ऑफिस ते स्वयंभू गणेश मंदिर चौक: या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांना प्रवेश बंदी असेल.३. सीपीआर सिग्नल चौक ते भवानी मंडप: सीपीआर आणि माळकर सिग्नल चौक, तसेच भवानी मंडप येथून प्रवेश बंद केला आहे.४. बिंदू चौक ते छ. शिवाजी महाराज चौक: पापाची तिकटीकडे जाणाऱ्या वाहनांना बिंदू चौक व पापाची तिकटी येथे प्रवेश बंद असेल.५. महालक्ष्मी चौक ते पापाची तिकटी: या मार्गावर महालक्ष्मी चौकातून पुढे जाण्यास बंदी असेल.६. गुजरी कॉर्नर ते महालक्ष्मी पॅलेस: भवानी मंडप आणि गुजरी कॉर्नर (भाऊसिंगजी रोड व शुक्रवार मित्र मंडळ चौक) येथून पुढे जाण्यास बंदी आहे.७. बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी: या मार्गावर बिनखांबी गणेश मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.(टिप: पोलीस वाहने, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका यांना या नियमातून सूट असेल.)🔄 वाहतुकीसाठी पर्यायी मार्गव्हिनस कॉर्नरकडून दसरा चौकाकडे जाणारी वाहतूक: डावीकडे वळून फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, स्वयंभू मंदिर, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका, सीपीआर हॉस्पिटल, छ. शिवाजी महाराज पूल मार्गे पुढे जाईल.जुने ट्रॅफिक ऑफिसकडून दसरा चौकाकडे जाणारी वाहतूक: सरळ पुढे जाऊन सीपीआर हॉस्पिटल चौक, छ. शिवाजी महाराज पूल मार्ग किंवा स्वयंभू सिग्नल चौक, दसरा चौकाकडून येणारी वाहतूक कोंडा ओळ किंवा महाराणा प्रताप चौक मार्गे जाईल.सीपीआर चौकाकडून छ. शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक: जुना बुधवार तालीम, तोरस्कर चौक, छ. शिवाजी महाराज पूल मार्गे किंवा महाराणा प्रताप चौकातून शाहूपुरीकडे वळवण्यात आली आहे.बिंदू चौकातून छ. शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक: मिलन हॉटेल चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महाराणा प्रताप चौक, सीपीआर चौक मार्गे मार्गस्थ होईल.बिनखांबी मंदिर व महालक्ष्मी चौकाकडून पापाची तिकटीकडे जाणारी वाहतूक: महालक्ष्मी चौक येथून डावीकडे वळून ताराबाई रोड, सरस्वती टॉकीज मार्गे जाईल.रंकाळा स्टँडवरून मिरजकर तिकटीकडे जाणारी वाहतूक: रात्री २०:०० वाजल्यानंतर संभाजी आवास, गंगावेश, रेंगे टाकी, गायकवाड बंगला, छ. शिवाजी महाराज पूल, सीपीआर, खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जाईल.🅿️ पार्किंगची ठिकाणेवाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनांसाठी खालील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत:चितळे मठ: दुचाकी वाहनांसाठीशहाजी कॉलेज: चार चाकी वाहनांसाठीव्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डा: दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी१०० फुटी रोड (खानविलकर पेट्रोल पंप जवळ): चार चाकी वाहनांसाठीकरवीर पंचायत समिती कार्यालय आवार: दुचाकी वाहनांसाठीप्रायव्हेट हायस्कूल: चार चाकी वाहनांसाठीशाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियम बाहेरील बाजू: दुचाकी व चार चाकी वाहनांसाठीबिंदू चौक येथील महानगरपालिका पार्किंग: चार चाकी वाहनांसाठीवाहतूक पोलिसांचे आवाहन:उत्सवादरम्यान शहरात येणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

No comments: