Header Ads

मुलीच्या छेड प्रकरणी तरुणास अटक.

 मुलीच्या छेड प्रकरणी तरुणास अटक.

---------------------------

मुरगुड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

---------------------------

    गेल्या एक महिन्यापासून वेळोवेळी शाळेकरी मुलीच्या मागे लागून त्यांना हातवारे कारणे, त्यांचा पाठलाग करणे, या संबंधीत मुलीच्या पालकांनी मुरगूड पोलिसात दिलेल्या वर्दीनुसार अथर्व उत्तम येजरे ( वय-२० रा. बोळवीवाडी, ता. कागल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यामंदीर बोळावी परीसरात तसेच बोळावी येथील एस. टी. स्टॅड ते ठाणेवाडी ता. कागल येथील एस. टी. स्टॅडपर्यंत अथर्व उत्तम येजरे हा मोटरसायकलने शाळेकडे येणाऱ्या पिडीत मुलीस व तिच्या मैत्रीनींना वारंवार पाठलाग करीत त्यांना हातवारे करीत होता. यासंबंधी पिडीत मुलीने आपल्या घरी हा प्रकार सांगीतल्यानंतर पालकांनी मुरगूड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अथर्व उत्तम येजरे याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांनी बाललैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.