Header Ads

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची विद्यार्थ्यांची कार्यशाळा

 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची विद्यार्थ्यांची कार्यशाळा.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रेंदाळ प्रतिनिधी

सचिन कुंभार 

मो. नं.9021281100.

~~~~~~~~~~~~~~~~~~

रेंदाळ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, रेंदाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत मा. सौ. डॉ. जी. पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. मातीच्या मूर्ती, रासायनिक रंगांना नकार, प्लास्टिकमुक्त सण आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

       गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शाडू/मातीच्या मूर्तींचा वापर करावा तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

      या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त सण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत जागृती निर्माण करणे हा होता.

“इको-फ्रेंडली गणेशोत्सव – पर्यावरण वाचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न!” या संदेशातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.