Header Ads

७८६ नंबरच्या नोटांचे आमिष; शेतकऱ्याला १३.८१ लाखांचा ऑनलाइन गंडा! फेसबुक जाहिरातीतून फसवणुकीचे जाळे; ५५ लाख मिळणार असल्याचे सांगून विविध कारणांनी उकळले लाखो रुपये

 ७८६ नंबरच्या नोटांचे आमिष; शेतकऱ्याला १३.८१ लाखांचा ऑनलाइन गंडा!

फेसबुक जाहिरातीतून फसवणुकीचे जाळे; ५५ लाख मिळणार असल्याचे सांगून विविध कारणांनी उकळले लाखो रुपये.


फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | सांगली प्रतिनिधी : राजू कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सायबर भामट्यांनी शेतकऱ्याला ७८६ क्रमांकाच्या नोटा विकल्यास त्याबदल्यात ५५ लाख २१ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. फेसबुकवरील जाहिरात पाहिल्यानंतर शेतकऱ्याने संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी फोनवरून विश्वास संपादन करत कर, प्रक्रिया शुल्क, नोटांची पडताळणी, परवानगी शुल्क आणि इतर विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने पैसे मागितले.

शेतकऱ्याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तसेच ऑनलाइन स्कॅनरद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. मात्र, १३.८१ लाख रुपये भरल्यानंतरही ना ५५ लाखांची रक्कम मिळाली, ना नोटांची खरेदी झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून संबंधित बँक खाती आणि मोबाईल क्रमांकांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांसाठी सायबर पोलिसांचा इशारा

सोशल मीडियावरील अशा आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.

दुर्मिळ नोटा, नाणी किंवा मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींना पैसे पाठवू नका.

फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.

No comments:

Powered by Blogger.