गणेशोत्सवाआधी सांगली पोलिसांचा मोठा दणका; कोमल धुमाळसह तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार
गणेशोत्सवाआधी सांगली पोलिसांचा मोठा दणका; कोमल धुमाळसह तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार
--------------------------
सांगली | प्रतिनिधी.
राजू कदम.
--------------------------
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठी कारवाई करत कोमल रामचंद्र धुमाळ, अमित रामचंद्र धुमाळ आणि वैशाली रामचंद्र धुमाळ या तिघांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये हा आदेश जारी केला. संबंधित टोळीविरुद्ध २०२२ ते २०२५ दरम्यान खाजगी सावकारी, खंडणी, अपहरण, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, घातक हत्याराने हल्ला आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगली पोलिसांनी स्पष्ट केले.



No comments: