Header Ads

‘सेवा हीच खरी समाजसेवा’चा संदेश! संभाजीनगरात निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 ‘सेवा हीच खरी समाजसेवा’चा संदेश! संभाजीनगरात निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

----------------------------

पुसद प्रतिनिधी 

सिद्धार्थ कदम

----------------------------

समाजहिताचा संकल्प आणि निस्वार्थ सेवाभाव जपत संभाजीनगर, पुसद येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. रंगनाथ धिरे तसेच बालाजी गणेश मंडळ, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात पुसदमधील नामांकित डॉक्टरांच्या MediCare टीमने विविध आजारांची तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह अनेक रुग्णांना आवश्यक उपचार आणि पुढील काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. रंगनाथ धिरे यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित केल्याचे सांगितले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

“सेवा हीच खरी समाजसेवा… माणुसकी जपूया, आरोग्याची काळजी घेऊया!” हा संदेश देत शिबिराचा समारोप करण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.