राधानगरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर! तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा; मनसेची तहसीलदारांकडे जोरदार मागणी.
राधानगरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर! तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा; मनसेची तहसीलदारांकडे जोरदार मागणी.
------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
राधानगरी तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे केली आहे. पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले असून शासनाने तातडीने पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
यंदाच्या हंगामात तालुक्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाल्याने भात, ऊस, नाचणी, केळीसह इतर पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गावांतील शेतजमिनींना भेगा पडल्या असून तीव्र उन्हामुळे उभी पिके वाळत आहेत. मोठा खर्च करून पिके उभी केलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
मनसेने निवेदनात शासनाकडे राधानगरी तालुक्याची वस्तुनिष्ठ पाहणी करून दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, सर्व बाधित पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, तसेच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाण्याची उपलब्धता यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष उमेद निल्ले, जगदीश पाटील, नंदू टेपूगडे, सलीम खाडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: