Header Ads

गणरायाच्या साक्षीने महादान! कुपवाड MIDC पोलिसांचे आज भव्य ‘महा रक्तदान शिबिर’; PI आनंदराव घाडगे यांचा सामाजिक पुढाकार

 गणरायाच्या साक्षीने महादान! कुपवाड MIDC पोलिसांचे आज भव्य ‘महा रक्तदान शिबिर’; PI आनंदराव घाडगे यांचा सामाजिक पुढाकार


कुपवाड | मिरज 

गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात समाजसेवेचा अनोखा संदेश देत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने आज, गुरुवार १७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘महा रक्तदान शिबिर’ आणि गणपती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामागे कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांचा पुढाकार असून नागरिकांना रक्तदानासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी १०.०० वाजता एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या आवारात रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. “आपले एक रक्तदान कोणाचे तरी जीवन वाचवू शकते” हा सामाजिक संदेश देत पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

“रक्तदान हेच खरे महादान”

गणरायाच्या आशीर्वादाने समाजासाठी जीवनदायी ठरणाऱ्या या उपक्रमात परिसरातील नागरिक, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदानानंतर सर्व रक्तदाते आणि उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

“एका थेंब रक्ताचा... वाचू शकतो एका जीवाचा!” या संदेशासह कुपवाड पोलिसांनी नागरिकांना रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.