दूधगंगा नदी घाटावर अक्षय ॲग्रोतर्फे स्वच्छता मोहीम.
दूधगंगा नदी घाटावर अक्षय ॲग्रोतर्फे स्वच्छता मोही
--------------------------------
सिद्धनेर्ली प्रतिनिधी
सचिन मोहिते
--------------------------------
सिद्धनेर्ली : अक्षय ॲग्रो कंपनीचे मालक श्री. जयवंत पोवार यांच्या पुढाकाराने कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान नदी घाट परिसर तसेच नदीपात्रातील कचरा व अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नदी व नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने घाट परिसरात ‘नदी घाट व नदीपात्र स्वच्छ ठेवावे’ अशा आशयाचे जनजागृतीपर फलकही लावण्यात आले.
नदी, पर्यावरण आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत अक्षय ॲग्रो कंपनीने राबविलेल्या या उपक्रमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
No comments: