जुन्नरमध्ये 11.55 लाखांची बनावट दारू जप्त; तिघांना अटक
जुन्नरमध्ये 11.55 लाखांची बनावट दारू जप्त; तिघांना अटक
नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावच्या हद्दीत बांगरवाडी वस्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बनावट विदेशी दारूचे रॅकेट उध्वस्त केले.
पथकाने प्रथम 96 विदेशी व 5040 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. आरोपींच्या माहितीवरून पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे दुसरा छापा टाकून आणखी 3120 बनावट बाटल्या जप्त केल्या. एकूण 11 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त.
या प्रकरणी सचिन गाडगे, ताहिर शेख (दोन्ही रा. निमगाव सावा) आणि सागर बोरुडे (रा. अळकुटी) या तिघांना अटक. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शरद जाधव यांच्या पथकाची कारवाई.

No comments: