सावित्रीबाई फुले अंगणवाडी मांडूकली गावठाण येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण विभाग प्रकल्प अधिकारी नितीन मस्के यांची सदिच्छा भेट!
सावित्रीबाई फुले अंगणवाडी मांडूकली गावठाण येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण विभाग प्रकल्प अधिकारी नितीन मस्के यांची सदिच्छा भेट!
अंगणवाडीची पाहणी करून कामकाजाचा घेतला आढावा.
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. नितीन मस्के साहेब यांनी मांडूकली गावठाण येथील सावित्रीबाई फुले अंगणवाडीला सदिच्छा भेट देऊन अंगणवाडीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील उपलब्ध सुविधा, स्वच्छता, बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला.
अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे, पूर्वप्राथमिक शिक्षण देणे आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी नितीन मस्के साहेब यांनी अंगणवाडीची पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली.
अंगणवाडी हे बालकांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाचे पहिले पाऊल असून, अंगणवाडी सेविकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असल्याचे या भेटीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
या सदिच्छा भेटीमुळे अंगणवाडीच्या कामकाजाला प्रोत्साहन मिळाले असून, बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
मांडूकली गावठाण येथील सावित्रीबाई फुले अंगणवाडीच्या या भेटीमुळे अंगणवाडीच्या कामकाजाला प्रोत्साहन मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण विभाग नितीन मस्के, संजय जाधव कक्ष अधिकारी, विद्या पाटील वरिष्ठ सहाय्यक, प्रतिभा शिर्के सहाय्यक बाल विकास अधिकारी पन्हाळा, पूजा खाडे बालविकास प्रकल्प अधिकारी गगनबावडा, गगनबावडा बीट पर्यवेक्षिका, रूपाली सरनाईक, मांडूकली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी भिवाजी बचाटे, अंगणवाडी सेविका सौ रेशमा कांबळे, पायल हंकारे इत्यादी उपस्थित होते,

No comments: