Header Ads

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्नाटकातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल

 बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्नाटकातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल.


प्रतिनिधी: रहिम पिंजारी

कोल्हापूर:

जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांनी एका गंभीर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपी वृषभ बाहुबली शंकरगोडा (वय २५, रा. अलारवाडी, बेळगाव, कर्नाटक) याच्यावरील गुन्हा शाबीत झाला असून, त्याला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि २,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलीस आणि न्यायालयीन कारवाईचा तपशील:

सन २०२१ मध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२१ नुसार भा.द.वि. (IPC) कलम ३६३, ३७६ (आय) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) च्या कलम ४, ६, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. यानंतर न्यायालयाने स्पेशल केस नं. १२४/२०२१ अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी चालवली.

न्यायालयाचा अंतिम निकाल:

आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी घोषित केले. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड ठोठावला आहे. जर आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास, त्याला अतिरिक्त एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एम. जाधव यांनी केला आहे. तर संपूर्ण तपास प्रक्रियेचे पर्यवेक्षण आणि संनियंत्रण देखरेख अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री किरण लोंढे सो यांनी केले आहे.

हे प्रकरण आता माननीय कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून, मा. श्री ए एल पेरमपल्ली सो (जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोर्ट क्र. ०३, कोल्हापूर) यांच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. शासनाच्या वतीने सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती कुलकर्णी मॅडम बाजू मांडणार आहेत.

न्यायालयीन कामकाजात पोलिसांच्या वतीने समन्वय साधण्यासाठी आणि पैरवीसाठी (Pairvi Officer) जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पो. कॉ. ब.नं. १४२३ विशाल तळेकर आणि पो. कॉ. ब. नं २६३९ अंकुश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.