अमरावतीत पोलिसांचा ‘नशामुक्ती’साठी दणका! नशेखोर, विक्रेते आणि फरार आरोपींवर धडक कारवाई
अमरावतीत पोलिसांचा ‘नशामुक्ती’साठी दणका! नशेखोर, विक्रेते आणि फरार आरोपींवर धडक कारवाई
एकाच दिवसात ४० जणांना अटक; फरार व वॉरंटधारकांसह २४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.
अमरावती | पी. एन. देशमुख, प्रतिनिधी
अमरावती शहरात नशेचा व्यापार करणारे, नशेचे सेवन करणारे आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींविरुद्ध शहर पोलिसांनी धडक मोहीम राबवली. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
नशिल्या पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई
राजापेठ आणि नागपुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नशिल्या पदार्थांच्या विक्रीप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. राजापेठ पोलिसांनी १ लाख ९१ हजार ८२० रुपयांचा, तर नागपुरी गेट पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपये किमतीचा नशिला पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांवरही कारवाई
सार्वजनिक परिसरात एमडीसह अन्य नशिल्या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध ३६ ठिकाणी कारवाई करून ४० जणांना अटक करण्यात आली. तसेच अवैध शस्त्रांचा वापर करणाऱ्या दोन आरोपींविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली.
फरार आरोपी आणि वॉरंटधारक पोलिसांच्या ताब्यात

दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या १२ फरार आरोपींना विशेष मोहिमेदरम्यान पकडण्यात आले. याशिवाय, पोलिसांनी सूचना देऊनही हजर न राहिलेल्या १२ आरोपींना वॉरंटनुसार अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवसात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी अवैध नशेचा व्यापार, सार्वजनिक ठिकाणी नशा आणि फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यावर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती शहर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे नशिल्या पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांसह फरार आरोपींनाही कडक इशारा मिळाला आहे.

No comments: