Header Ads

हुपरी-रेंदाळ परिसर बांधकाम व्यावसायिक संघाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!

हुपरी-रेंदाळ परिसर बांधकाम व्यावसायिक संघाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न! बांधकाम क्षेत्रातील समस्या, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण बांधकामावर मान्यवरांचे मार्गदर्शन

*रेंदाळ प्रतिनिधी*

*सचिन कुंभार*

9021281100 


*हुपरी* : हुपरी-रेंदाळ परिसर बांधकाम व्यावसायिक संघ, हुपरी (ता. हातकणंगले) यांच्या वतीने आयोजित सेंट्रिंग बांधकाम कारागिरांचा स्नेहमेळावा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी यळगूड येथील मोहिते हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक, कारागीर आणि इंजिनिअर यांच्यात स्नेहभाव वाढविण्यासह बांधकाम क्षेत्रातील विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ श्रीपती नाना लोहार होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक धनाजीराव हुजरे-पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक व कारागिरांच्या समस्या सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी श्रीपती लोहार आणि अशोकराव महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बांधकाम व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी, बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, बांधकामातील गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. दर्जेदार बांधकामासाठी व्यावसायिकांसह कारागिरांनीही कौशल्यवृद्धी व तांत्रिक ज्ञानाला प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या स्नेहमेळाव्यास गुरुकृपा ट्रेडर्सचे अशोक महाजन, गौरीशंकर स्टीलचे सागर जंगम, अनिकेत ट्रेडर्सचे अरुण मुराळी, श्रेयश सप्लायर्सचे संदीप बाळीकाई, सहारा ट्रेडर्सचे पिंटू शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच संघटनेचे संचालक सुधाकर सुतार, रंगराव निकम, शिवाजी कांबळे, तानाजी खोत, शिवाजी पाटील, मोहन पाटील, संभाजी निकम, महादेव भोसले, उत्तम शिंगे, बासू कांबळे, आकाराम कट्टी आणि संतोष माने यांच्यासह सेंट्रिंग बांधकाम कारागीर, बांधकाम व्यावसायिक व इंजिनिअर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या शेवटी विलासराव पाटील यांनी आभार मानले. परस्पर सहकार्य, व्यावसायिक एकजूट आणि बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता वाढविण्याचा संदेश देणारा हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

No comments:

Powered by Blogger.