माणुसकीची भिंतचा आगग्रस्त पवार कुटुंबाच्या हाकेला लगेच प्रतिसाद
माणुसकीची भिंतचा आगग्रस्त पवार कुटुंबाच्या हाकेला लगेच प्रतिसाद कुटुंबाच्या विनंतीनंतर दानशूरांच्या सहकार्यातून पत्रे व गृहोपयोगी साहित्याची मदत.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद / आरेगाव:
आरेगाव येथील रहिवासी पंकज तारासिंग पवार यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला होता. या दुर्घटनेत घरातील अन्नधान्य, भांडी, कपडे आणि सर्व साहित्य नष्ट झाल्याने कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले होते. या भीषण संकटात सापडल्यानंतर पवार कुटुंबाने 'माणुसकीची भिंत' या सामाजिक उपक्रमाकडे संपर्क साधून संसाराच्या पुनर्उभारणीसाठी मदतीची याचना केली होती. त्यांच्या या विनंतीला तातडीने प्रतिसाद देत 'माणुसकीची भिंत' समूहाने दानशूरांच्या सहकार्यातून पवार कुटुंबाला ८ टिन पत्रे आणि संपूर्ण गृहोपयोगी साहित्य खरेदी करून सुपूर्द केले आहे.
पवार कुटुंबाच्या विनंतीनंतर 'माणुसकीची भिंत' उपक्रमाच्या वतीने संवेदनशील नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूरांनी सढळ हाताने आर्थिक मदत दिली. दात्यांकडून जमा झालेल्या निधीतून कुटुंबाच्या डोक्यावर पुन्हा निवारा उभा करण्यासाठी १२ फुटांचे ८ नग टिन पत्रे खरेदी करण्यात आले. यासोबतच दैनंदिन संसारासाठी अत्यावश्यक असलेली गॅस शेगडी, कुकर, हंडा-कळशी, कढई, पातेले, तवा यांसह सर्व गृहोपयोगी भांडी प्रत्यक्ष खरेदी करून कुटुंबाकडे सोपवण्यात आली.
अचानक ओढवलेल्या या संकटात आपण केलेल्या विनंतीला तातडीने मान देऊन आधार दिल्याबद्दल पवार कुटुंबाने सर्व दानशूर दाते आणि 'माणुसकीची भिंत' समूहाचे मनापासून आभार मानले आहेत. मदत करणारे दाते माणुसकीची भिंत सर्व सदस्य,मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था,संगीताताई संजय जाधव, प्रा प्रकाश लामणे अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा, पुसद ,शिवशंकर- अनुसया तडकसे चॅरिटेबल फांऊडेशन पुसद संतोष तडकसे,अद्विक कुणाल गिरगांवकर , निशांतभाऊ देऊळकर,श्रीवास बंधु अंजली ड्रेसेस आर्णी,अमोलभाऊ जगताप,रेवा मेडिकल स्टोअर्स अभिषेकभाऊ काकडे,डॉ.नंदकुमार देशमुख शेंबाळपिपरी,संदीप भाऊराव मानकर, पुसद,गजाननभाऊ तिलवंत,पद्मभूषण शिवराम राजगुरू पुसद ,अमित मधुकर पातुरकर, वैभव भाऊ दिल्ली, रमेश उमेश देवतळे, जयसिंग राठोड, धनंजय कोठाळे, सुरेंद्र सिंह राठोड, या सर्वांनी त्यांचा संसार पुन्हा पहिल्यासारखा उभा व्हावा याकरिता पैशाची मदत केली. यावेळेस माणुसकीची भिंत मिशन ग्रीन गुरुदेव सेवा मंडळ या संस्थेचे सर्व सदस्य सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव पंजाब ढेकळे सदस्य अनंता चतुर मधुकर चव्हाण दिगंबर देशमुख रमेश डंबोळे पवन बोजेवार सोनू पाटील सचिन सुरोशे अमित हटवार दादाराव पाईकराव प्रमोद ठाकूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगग्रस्त उघड्यावर आलेल्या गरजवंत परिवाला ताबडतोब झालेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: