Header Ads

परळीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; कुत्रा गंभीर जखमी.

 परळीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; कुत्रा गंभीर जखमी.


सातारा प्रतिनिधी : अमर इंदलकर

परळी (ता. सातारा) : परळी गावातील मोहन दिनकर गंगावणे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मोहन गंगावणे यांच्या घराजवळ कुत्रा खुंट्टीला बांधलेला होता. रात्रीच्या सुमारास आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. कुत्रा बांधलेला असल्यामुळे बिबट्याला त्याला सोबत घेऊन जाता आले नाही. त्यामुळे काही काळानंतर बिबट्या तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात बिबट्याचा वावर आहे का, याचा शोध घ्यावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

— प्रतिनिधी : अमर इंदलकर

No comments:

Powered by Blogger.