सोन्याचे शिरोली सरपंच सौ अश्विनी चौगुले यांनी पदाचा राजीनामा राजकीय वर्तुळात खळबळ
सोन्याचे शिरोली सरपंच सौ अश्विनी चौगुले यांनी पदाचा राजीनामा राजकीय वर्तुळात खळबळ
सरपंच निवडणूक मार्च 27 होणार.
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील लोक नियुक्ती सरपंच सौ अश्विनी गुरुनाथ चौगुले यांनी आपला पदाचा राजीनामा राधानगरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला
या बाबत अधिक माहिती अशी की सोन्याची शिरोली येथील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वर गोविंद चौगुले नंदकुमार पाटील प्रकाश डेळेकरयांच्या पॅनल सत्ता लोक नियुक्ती सरपंच दहा उमेदवार निवडून आली असल्याने त्यामुळे सत्ता चौगुले पाटील डेळेकर यांच्याकडे आल्याने नियुक्त सरपंच सौ अश्विनी गुरुनाथ चौगुले यांनी पदभार स्वीकारला होता त्यांची मदत अडीच वर्षाची होती ती संपून एक वर्ष होऊन गेल्यावर त्यांनी साडेतीन वर्ष पदाचा उपयोग घेऊन आपला पदाचा राजीनामा राधानगरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे नुकताच देण्यात आला आहे तो मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे सोन्याची शिरोली मध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक मार्चमध्ये 27 मध्ये होणार असल्याने समजते त्यासाठी राजकीय वर्तुळात सरपंच पदासाठी मोरचे बांधणी चालू झाली असल्याचे समजते

No comments: