Header Ads

यवतमाळ तून ३२.८० लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपी आसाममधून अटकेत!

 यवतमाळ तून ३२.८० लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपी आसाममधून अटकेत!


सिद्धार्थ कदम

यवतमाळ | पुसद तालुका प्रतिनिधी.

यवतमाळ शहरात तब्बल ३२ लाख ८० हजार २०० रुपयांची सायबर फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आसाम राज्यातील धुब्री जिल्ह्यातून अटक केली. अझिझुल इस्लाम (वय ३२, रा. चागलाचारा, जि. धुब्री, आसाम) असे आरोपीचे नाव आहे.

यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक माहिती, डिजिटल संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर आसाम पोलिसांच्या मदतीने त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अटक करण्यात आली.

आरोपीला यवतमाळ येथे आणण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्याला यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे व त्यांच्या पथकाने केली.

सायबर फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणातील आरोपीचा आसामपर्यंत माग काढत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले जात आहे.

No comments:

Powered by Blogger.