मिरजेत चाकूचा धाक दाखवून लूटमार; सराईत गुन्हेगार दोन तासांत जेरबंद!
मिरजेत चाकूचा धाक दाखवून लूटमार; सराईत गुन्हेगार दोन तासांत जेरबंद!
मिरज | प्रतिनिधी
मिरज रेल्वे स्टेशन परिसरातील हेअर कटिंग सलूनमध्ये चाकूचा धाक दाखवून २५० रुपये लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. अल्ताफ ऊर्फ हटेला अन्वर शेख (वय २२, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सलूनमध्ये आलेल्या मधुकर खंडाप्पा कांबळे यांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम हिसकावून घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. सन २०२५ मध्ये त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.

No comments: